स्त्रियांनो, हस्तमैथुन करण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

एका रिपोर्टनुसार जगभरात जवळपास 62 टक्के स्त्रिया हस्तमैथुन करतात. 

स्त्री-पुरुषांच्या लैंगिक क्रिडेमध्ये स्त्रिया परमोच्च बिंदूपर्यंत पोहचू शकत नाहीत. मात्र हस्तमैथुनामुळे आपल्याला काय हवे आहे, कशात आनंद मिळतो, सुखाचा उच्चतम बिंदू काय केले की गाठता येतो हे समजते. 

हस्तमैथुनामुळे शरीरात मुड चांगला करणारी संप्रेरक स्रवतात. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो. 

झोपण्यापूर्वी हस्तमैथून केल्यामुळे तुम्ही रिलॅक्स होता. झोप येण्यासाठीही हस्तमैथुन फायद्याचे ठरते हे एका अभ्यासातून समोर आले आहे. 

राग, निराशा, चीडचीड अशा अनेक भावनिक आणि मानसिक समस्यांवर हस्तमैथुन हा एक चांगला उपाय ठरू शकतो. 

दरम्यान, हस्तमैथुन पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे प्रजनन क्षमतेवर याचा कुठलाच प्रभाव पडत नाही 

हस्तमैथुनामुळे अशक्तपणा येणे अथवा लैंगिकतेत कमतरता या पूर्णतः चुकीच्या गोष्टी आहेत. मात्र यामध्ये हस्तमैथुन हे प्रमाणात असावे हे ध्यानात ठेवा. 

Thank you