Health: किडनीचे आरोग्य जपण्यासाठी अवश्य करा ‘या’ गोष्टी
किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. तो निरोगी राखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

मुंबई, किडनी हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये समस्या आल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच किडनीशी (kidney Health Tips) संबंधित गंभीर आजारांना समोर जावे लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, किडनीचे मुख्य काम रक्त शुद्ध करणे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, मूत्रपिंडाचे मुख्य काम रक्तातून पाणी आणि सोडियम वेगळे करणे आहे. या व्यतिरिक्त, मूत्रपिंड म्हणजेच किडनी रेनिन एंजाइम तयार करते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. चुकीच्या आहारामुळे किडनीमध्ये स्टोन तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कंबर आणि पोटातही वेदना होतात. यासोबतच लघवीलाही त्रास होतो. यासाठी किडनी निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही किडनी निरोगी ठेवायची असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा
पेनकिलर घेऊ नका
औषधाच्या अतिसेवनाने किडनीवर वाईट परिणाम होतो. सामान्य डोकेदुखी आणि थकवा आल्यावर लोकं वेदनाशामक औषधांचे सेवन करतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. हे अजिबात करू नका. जगरज नसेल तर औषध अजिबात घेऊ नका. त्याऐवजी घरगुती उपाय करू शकता.
व्यायाम करा
आरोग्य तज्ञ नेहमी निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचा सल्ला देतात. तसेच संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करा. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच चयापचय देखील वाढतो.
भरपूर पाणी प्या
किडनी निरोगी ठेवायची असेल, तर दररोज पुरेसे पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तसेच शरीर हायड्रेटेड राहते. त्याच वेळी, ते किडनीसाठी देखील फायदेशीर सिद्ध होते. यासाठी दररोज किमान 3 लिटर पाणी प्यावे.